कल्याण : मोबाईल चोर असल्याच्या संशयावरून दोघांना विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. ही १९ फेब्रुवारी दुपारची घटना आहे. यासंदर्भातील व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत. याप्रकरणी सलमान शेख याने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनीष गोसावी आणि सिधुल गुजर अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. बेदम मारहाण प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहेत. सलमान शेख यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हिडिओआणि सीसीटीव्हीच्याआधारे तरुणांना मारहाण करणाऱ्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. ज्या तरुणांना मारहाण झाली आहे त्या तरुणांचा काही पोलीस रेकॉर आहे का? याचा तपास सुद्धा पोलीस करत आहेत.
म्हणून दोन युवकांची विवस्त्र करून केली बेदम मारहाण
• SHARVIKA WARANGE