मुरबाड (मंगल डोंगरे) जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या भितीने सर्वसामान्य जनता जिव मुठीत घेवून जगत असताना, ज न ते च्या संरक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. __ जिथे डॉक्टर, नर्सपोलीस, पत्रकार, सामाजिक संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते जिवाचे रान करताना दिसुन येत आहेत. तर दुसरी कडे,सॅनिटायझर,मास्क,अन्न धान्य, आणि इतर जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणा-या टोळ्या कार्यरत असुन त्यांचा बिमोड करणारे पोलीस खाते जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावत असताना ,कोणी बिअर,इंग्लिश दारू, तर कोणी गावठी दारू उत्पादन करून गोरगरीबांची लुटमार करुन त्यांच्या जिवनाशी खेळत आहेत.मात्र अशाच अवस्थेत आज दुपारी कोरोना होम क्वारंटाइनसाठी पेट्रोलिंग करताना मुरबाड पोलिसांना मुरबाड पासुन पाच किलोमीटर च्या अंतरावर असलेल्या मोजे खाटेघर गावच्या हद्दीत गावठी दारूचा धंदा राजरोस पणे सुरु असल्याची माहिती मिळाली. तेव्हा मुरबाड विभागिय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक विकास निकम , परि.पो.उप.नि.नरेश निंबाळकर, , सहाय्यक फौजदार आर. आर. तडवी, पोशि. के. एस. पाटील. यांनी खाटेघर येथील जंगलाची झडती घेत.तेथील दारचा अड़ा उध्वस्त करण्याचा डाव रचुन ,या गावठी दारचा शोध घेतला असता, एका लहानश्या ओढ्या शेजारी सुमारे ६४,१५०,/-रुपयांचा कच्च्या मुद्देमाल मिळुन आला असता,संपूर्ण मुद्देमाल उध्वस्त करून मुरबाड पोलिसांनी दारुबंदी विरुद्ध रंणशिंग फुकल्याने ,सर्व स्तरातुन पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.
कोरोनाच्या धामधुमीत लाखोंचा गावठी दारुचा मुद्देमाल नेस्तनाबुत !!मुरबाड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी
• SHARVIKA WARANGE